Home > वसई पालघर अपडेट न्यूज नेटवर्क

देशात कोरोनाचे रुग्ण दीड लाखाच्या वर…

केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाकडून देशातील कोरोनाग्रस्त रुग्णांची ताजी आकडेवारी प्रसिद्ध करण्यात आली आहे. ज्यामध्ये मंगळवारी चोवीस तासांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या तब्बल ६३८७ ने वाढली आहे. तर एका दिवसांत एकूण १७० जणांचा कोरोनामुळं मृत्यू झाल्याची माहिती समोर आली. एका दिवसात सहा हजारहून अधिक रुग्णांची वाढ झाल्यामुळं आता देशातील कोरोना रुग्णांचा

अधिक वाचा...

पाच हजार ११९ प्रवाशांना घेऊन ३ श्रमिक स्पेशल ट्रेन पालघर येथून रवाना

लॉकडाऊनमध्ये अडकलेल्या कामगारांना त्यांच्या मूळ राज्यात पाठविण्याच्या कामाला आता वेग आला आहे. उत्तर प्रदेश सरकारची परवानगी मिळाल्यानंतर बुधवारी पालघर येथून तीन श्रमिक स्पेशल गाड्यांना रवाना करण्यात आल्या. या श्रमिक स्पेशल ट्रेनने वाराणसी, जौनपूर आणि सुलतानपूरसाठी पाच हजार ११९ प्रवाशांना सोडले आहे. पालघरहून सुटणार्‍या श्रमिक स्पेशल ट्रेनमध्ये डहाणू रेल्वे स्थानकावर सुमारे

अधिक वाचा...
महाराष्ट्रात असा असेल लॉकडाऊन ४, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती

महाराष्ट्रात असा असेल लॉकडाऊन ४, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती

कोरोना व्हायरसने देशाचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. या पार्श्वभूमीवर जवळपास गेल्या दोन महिन्यांपासून लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनचा चौथा टप्पा १८ मे पासून सुरु होत आहे. लॉकडाऊनच्या पहिल्या तीन टप्प्यांहून हा चौथा टप्पा वेगळा असणार आहे, असं  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील जाहीर केलं होतं. त्यानंतर आता महाराष्ट्र लॉकडाऊन ४ मध्ये

अधिक वाचा...

पालघर साधू हत्याकांड प्रकरणी आणखी २४ जणांना अटक

गुन्हे अन्वेषण विभागाकडून मंगळवारी पालघर हत्याकांड प्रकरणी आणखी २४ जणांना अटक केलं. संपूर्ण देशाला हादरवणाऱ्या हत्याकांडामध्ये सहभाग असल्याच्या आरोपातून त्यांना ताब्यात घेण्यात आलं आहे. मॉब लिंचिंगमध्ये दोन साधु व त्यांच्या चालकाची अमानुष हत्या केल्याप्रकरणी त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. आतापर्यंत या प्रकरणाअंतर्गत जवळपास १३३ जणांना ताब्यात घेतलं आहे. अटक करण्यात

अधिक वाचा...

विरार पूर्व येथील अष्टविनायक सोसायटीच्या मुलांनी साजरा केला मातृदिन

आज १० मे... जागतिक मातृदिन... ज्या महान व्यक्तीने आपल्याला जन्म दिला तिच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करणारा दिवस. आपल्या जन्मदात्री आई ह्या शब्दालाही विशेष महत्त्व आहे. आजच्या धावपळीच्या जगामध्ये आई-वडिलांविषयी असणारी आस्था आणि आपुलकी जेथे कमी होत असताना दिसते तेथे विरार पूर्व साईनाथ नगर येथील अष्टविनायक सोसायटीमधील काही मुलांनी आपल्या आईबद्दल असणारे प्रेम

अधिक वाचा...

आई …!

आई म्हणजे काय असते, जन्म झाल्यावरचे प्रथम बोल असते तर मृत्यूसमयी शेवटचे वाक्य असते... आई म्हणजे काय असते, राखराखणाऱ्या उन्हामध्ये उभी सावली असते तर, ठेच आपल्याला लागली तरी वेदना सोसणारी ती माय असते... आई म्हणजे काय असते, आई म्हणजे परमेश्वराने पाठवलेली सप्रेम भेट असते... तर प्रेमाचा सागर असते कितीही दुष्काळ पडला तरी न संपणार पाणी असते... आई म्हणजे काय असते, आई म्हणजे आपल्या

अधिक वाचा...

राज्यामध्ये २० हजाराच्यावर कोरोनाबाधित रुग्ण, ७७९ मृत्यू

काल दिवसभरात राज्यात ११६५ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून यामध्ये ४८ जणांचा मृत्यू झाला आहे. त्याचप्रमाणे कोरोनाबाधित रुग्णांची संख्या २० हजार २२८ एवढी झाली आहे. तर राज्यभरात ३८०० रुग्ण कोरोनामुक्त झाल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. सर्वात जास्त १२ हजार ६८४ रुग्ण एकट्या मुंबईत असून वसई विरार क्षेत्रात एकूण

अधिक वाचा...

औरंगाबादजवळ रेल्वे रुळावर झोपलेले १६ मजूर चिरडून ठार

औरंगाबाद तालुक्यातील सटाणा शिवारात रेल्वे रुळावर थकून झोपलेले १६ मजूर मालवाहू रेल्वेखाली चिरडून ठार झाल्याचा भीषण अपघात आज पहाटे ५.१५ वाजता झाला. यात २ मजूर गंभीर जखमी असून, तिघे जीव वाचविण्यात यशस्वी ठरले आहेत. सर्व मजूर मध्य प्रदेश येथील असून ते जालना येथे लॉकडाऊनमध्ये अडकले होते. घराच्या ओढीने सर्व मजूर

अधिक वाचा...

राज्यात कोरोनाचे ७७१ नवीन रूग्ण, ३५ जणांचा मृत्यू

आजच्या दिवसभरात राज्यात कोरोना विषाणूचे ७७१ नव्या रुग्णांची भर पडली आहे. तसेच कोरोना  ३५ रुग्णांचा बळी गेला आहे. त्यामुळे राज्यात आता एकूण चौदा हजार ५४१ कोरोना रुग्ण झाले आहेत. तर एकूण ५८३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्याचसोबत वसई विरारमध्ये आज दिवसभरात कोरोनाचे ३ नवीन रुग्ण आढळून आले व १५ रुग्ण कोरोना

अधिक वाचा...

धक्कादायक : पालघरमध्ये फेसबुकवरून घरपोच दारू विक्री

देशामध्ये लोकडाऊन असताना जेथे जीवनावश्यक वस्तू मिळविण्यासाठी लोकांची धडपड चालू असताना पालघर मधील एका महाभागाने घरपोच दारू विकण्याची जाहिरातच फेसबुक अकाउंटद्वारे केली आहे. https://www.facebook.com/Sahil-kumar-102021471501809/ साहिल कुमार असे या व्यक्तीचे नाव असून त्याने त्याने २८ एप्रिल २०२० रोजी ह्याच नावाने रात्री ११.२२ वाजता हे अकाउंट बनविले आहे आणि त्यामध्ये आपला संपर्क क्रमांक देऊन

अधिक वाचा...