Home > अपघात

औरंगाबादजवळ रेल्वे रुळावर झोपलेले १६ मजूर चिरडून ठार

औरंगाबाद तालुक्यातील सटाणा शिवारात रेल्वे रुळावर थकून झोपलेले १६ मजूर मालवाहू रेल्वेखाली चिरडून ठार झाल्याचा भीषण अपघात आज पहाटे ५.१५ वाजता झाला. यात २ मजूर गंभीर जखमी असून, तिघे जीव वाचविण्यात यशस्वी ठरले आहेत. सर्व मजूर मध्य प्रदेश येथील असून ते जालना येथे लॉकडाऊनमध्ये अडकले होते. घराच्या ओढीने सर्व मजूर

अधिक वाचा...

वाडामध्ये रबर कंपनीला भीषण आग, लाखो रुपयांचा माल जळून खाक

तालुक्यातील खुपरी ग्रामपंचायतीच्या हद्दीतील रबर तयार करणाऱ्या  'रबर क्लार्क'  या कंपनीला आज पहाटे तीनच्या सुमारास भीषण आग लागली. या आगीत कच्चा- पक्का माल, कंपनीतील इतर सामान व कंपनीची इमारत जळून खाक झाली. आगीची माहिती मिळताच अग्निशामक दलाच्या पालघर, भिवंडी, वसई, तारापूर गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या व त्यांनी आगीला नियंत्रणात आणले. या

अधिक वाचा...

बोरहट्टी गावातील ‘त्या’ कुटुंबाचे स्थानिक आमदार व समाजसेवकांनी केले सांत्वन…

जव्हार तालुक्यातील बोरहट्टी गावात घराच्या कामासाठी माती खोदताना मातीची धडी अंगावर कोसळून मनोज यशवंत जाधव (वय ३०) व मुक्ता सुदाम तराळ (वय १६) यांचा मातीखाली दबून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना शुक्रवार १० एप्रिल रोजी घडली होती. या अपघातात अजून दोन महिला गंभीर जखमी झाल्या व चार जणांना किरकोळ दुखापत झाली

अधिक वाचा...

पालघरमध्ये मच्छीमारी बोट समुद्रात बुडाली; सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही

पालघरमधील घिवली येथील मासेमारीसाठी समुद्रात गेलेली एक मच्छामारी बोट गुरुवारी रात्री बुडाल्याची घटना समोर आली आहे. या दुर्घटनेत बोटीतील पाचही मच्छिमार पोहून सुरक्षितस्थळी पोहोचल्याने बचावले आहेत. त्यामुळे कोणतीही जीवितहानी झालेली नाही मात्र, बोटीचे मोठे नुकसान झाले आहे. याबाबत मिळालेली माहिती अशी की, घिवली येथील दर्शन पाटील हे गुरुवारी रात्री आपल्या चार

अधिक वाचा...

घरी पायी जाणं बेतलं जिवावर, मुंबई-अहमदाबाद मार्गावर पाच मजुरांचा अपघाती मृत्यू

करोनाचा वाढता प्रदुर्भाव रोखण्यासाठी देशात लॉकडाउनची घोषणा करण्यात आली आहे. देशांतर्गत सर्व सीमा खासगी आणि सरकारी वाहनांसाठी बंद करण्यात आल्या आहेत. त्यामुळे शहरात राहणाऱ्या लोकांची घराकडे जाण्यासाठी पायी मार्ग अवलंबला आहे. पण, हीच बाब पाच जणांच्या जिवावर बेतली आहे. मुंबई अहमदाबाद महामार्गावर विरारजवळील मांडवी येथे भीषण अपघात झाला असून करोनामुळे

अधिक वाचा...

पालघरमध्ये १७ महिन्यांत झाले १६ हजाराहून जास्त भूकंप, शास्त्रज्ञ सांगतात ही कारणे

भारतीय भूगर्भशास्त्रज्ञांनी नुकत्याच केलेल्या अभ्यासानुसार देशाच्या पश्चिम घाटात दीर्घकाळ अस्तित्त्वात असलेल्या निम्न-तीव्रतेच्या भूकंपांच्या घटनांचे कारण आढळले आहे. शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे की देशाच्या पश्चिम किनारपट्टीवर कमी-तीव्रतेचे भूकंप जाणवत आहेत, आणि ही भौगोलिक घटना आहे पावसाळ्यामध्ये अधिक प्राकर्षाणे दिसते. पालघर जिल्ह्यातील धुंधलवाडी गावच्या परिसरात नोव्हेंबर २०१८ पासून ही भूकंपांची मालिका सुरू झाली

अधिक वाचा...

तारापूर एमआयडीसीत भीषण स्फोट; ५ ठार

पालघर जिल्ह्यात बोईसर येथे तारापूर एमआयडीसीत शनिवारी सायंकाळी भीषण स्फोट झाला. या स्फोटात ५ जण मृत्युमुखी पडले आहेत तर सात जण गंभीर जखमी झाले आहेत. स्फोटाचा हादरा इतका मोठा होता की आसपासचा १० ते १५ कि.मी. चा परिसर हादरला. मृतांमध्ये कंपनीच्या मालकाचाही समावेश आहे. स्फोटाच्या हादऱ्यामुळे कंपनीच्या आवारातील एक

अधिक वाचा...

वसईजवळ समुद्रात बोट उलटली; एकाचा मृत्यू

वसईच्या रानगाव येथून कोशापीरा बेटावर समुद्रावर फिशिंगसाठी गेलेल्या तरुणांची बोट उलटल्याची घटना शुक्रवार ३ जानेवारी रोजी दुपारी घडली आहे. यात गिरीजच्या स्टिवन कुटिनो या ३७ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची माहिती हाती आली आहे. शुक्रवारी सकाळी ६च्या सुमारास वसई, गिरिज येथे राहणा-या सहा मित्रांचा ग्रुप फिशिंगसाठी साधी बोट आणि एक मशीनची अशा

अधिक वाचा...

वाडा येथे एसटीचा भीषण अपघात, ५२ प्रवासी जखमी

आज सकाळी ७ वाजता पालघर जिल्ह्यातील वाडा-अघई महामार्गावरील जांभुळपाडा येथे चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने एसटीला भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. या अपघातात ५२ प्रवासी जखमी झाले असून दोघांची प्रकृती गंभीर आहे. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. याबाबत मिळालेली माहिती अशी की, वाडा

अधिक वाचा...

मुंबईच्या तरुणीचा वाडामध्ये पुरात वाहून मृत्यू

वाढदिवसाच्या दिवशीच मृत्यूचा घाला वाढदिवसाच्या निमित्ताने वाडा तालुक्यातील कोहोज किल्ल्यावर पर्यटनासाठी आलेल्या, मुंबईतील बोरिवली येथील पिंकल रुपेनभाई शहा (२१) या तरुणीचा पुरात वाहून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. महाराष्ट्र टाईम्सने दिलेल्या बातमीनुसार पिंकल हिचा २९ जुलै रोजी वाढदिवस होता. वाढदिवस साजरा करण्याच्या निमित्ताने पिंकल ही वीरेंद्र घोरपडे, आकाश चर, ॲलन ॲल्विन व

अधिक वाचा...