Home > ठळक बातम्या

देशात कोरोनाचे रुग्ण दीड लाखाच्या वर…

केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाकडून देशातील कोरोनाग्रस्त रुग्णांची ताजी आकडेवारी प्रसिद्ध करण्यात आली आहे. ज्यामध्ये मंगळवारी चोवीस तासांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या तब्बल ६३८७ ने वाढली आहे. तर एका दिवसांत एकूण १७० जणांचा कोरोनामुळं मृत्यू झाल्याची माहिती समोर आली. एका दिवसात सहा हजारहून अधिक रुग्णांची वाढ झाल्यामुळं आता देशातील कोरोना रुग्णांचा

अधिक वाचा...
महाराष्ट्रात असा असेल लॉकडाऊन ४, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती

महाराष्ट्रात असा असेल लॉकडाऊन ४, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती

कोरोना व्हायरसने देशाचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. या पार्श्वभूमीवर जवळपास गेल्या दोन महिन्यांपासून लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनचा चौथा टप्पा १८ मे पासून सुरु होत आहे. लॉकडाऊनच्या पहिल्या तीन टप्प्यांहून हा चौथा टप्पा वेगळा असणार आहे, असं  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील जाहीर केलं होतं. त्यानंतर आता महाराष्ट्र लॉकडाऊन ४ मध्ये

अधिक वाचा...

पालघर साधू हत्याकांड प्रकरणी आणखी २४ जणांना अटक

गुन्हे अन्वेषण विभागाकडून मंगळवारी पालघर हत्याकांड प्रकरणी आणखी २४ जणांना अटक केलं. संपूर्ण देशाला हादरवणाऱ्या हत्याकांडामध्ये सहभाग असल्याच्या आरोपातून त्यांना ताब्यात घेण्यात आलं आहे. मॉब लिंचिंगमध्ये दोन साधु व त्यांच्या चालकाची अमानुष हत्या केल्याप्रकरणी त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. आतापर्यंत या प्रकरणाअंतर्गत जवळपास १३३ जणांना ताब्यात घेतलं आहे. अटक करण्यात

अधिक वाचा...

राज्यामध्ये २० हजाराच्यावर कोरोनाबाधित रुग्ण, ७७९ मृत्यू

काल दिवसभरात राज्यात ११६५ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून यामध्ये ४८ जणांचा मृत्यू झाला आहे. त्याचप्रमाणे कोरोनाबाधित रुग्णांची संख्या २० हजार २२८ एवढी झाली आहे. तर राज्यभरात ३८०० रुग्ण कोरोनामुक्त झाल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. सर्वात जास्त १२ हजार ६८४ रुग्ण एकट्या मुंबईत असून वसई विरार क्षेत्रात एकूण

अधिक वाचा...

पालघरमध्ये गृहमंत्री अनिल देशमुख यांचा दौरा, पोलीस अधीक्षक गौरव सिंह सक्तीच्या रजेवर

पालघर जिल्ह्यातील गडचिंचले येथे चोर समजून २ साधू आणि वाहनचालकाला दगडाने ठेचून निर्घृण हत्या करण्यात आली होती. या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला होता. या घटनेनंतर राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी यांनी काल घटनास्थळाला भेट दिली. यावेळी त्यांनी कासा पोलिस ठाणे आणि गडचिंचले येथील घटनास्थळी भेट दिली. सकाळी ११ वाजल्याच्या सुमारास गावात

अधिक वाचा...

राज्यात कोरोनाचे ७७१ नवीन रूग्ण, ३५ जणांचा मृत्यू

आजच्या दिवसभरात राज्यात कोरोना विषाणूचे ७७१ नव्या रुग्णांची भर पडली आहे. तसेच कोरोना  ३५ रुग्णांचा बळी गेला आहे. त्यामुळे राज्यात आता एकूण चौदा हजार ५४१ कोरोना रुग्ण झाले आहेत. तर एकूण ५८३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्याचसोबत वसई विरारमध्ये आज दिवसभरात कोरोनाचे ३ नवीन रुग्ण आढळून आले व १५ रुग्ण कोरोना

अधिक वाचा...

गडचिंचले तेथील प्रकरणी नागरिकांनी राज्य गुन्हे अन्वेषण विभागस माहिती दयावी – राज्य गुन्हे अन्वेषण

१६ एप्रिल रोजी पालघर मधील गडचिंचले येथे घडलेल्या दोन साधू व त्यांच्या चालकाच्या हत्येबाबत नागरिकांना काही माहिती असेल तर तात्काळ राज्य गुन्हे अन्वेषण विभाग यांना दयावी माहिती देणाऱ्या व्यक्तीबाबत गुप्तता पाळली जाईल, असे राज्य गुन्हे अन्वेषण विभागाने  प्रसिद्धी पत्रकाद्वारे सांगितले आहे. १६ एप्रिल रोजी कासा पोलीस ठाणे अंतर्गत गडचिंचले या

अधिक वाचा...

धक्कादायक : पालघर हत्याकांडातील एक आरोपी कोरोना बाधित

पालघर येथील गडचिंचले गावात झालेल्या साधूंच्या हत्याकांडातील एका आरोपीला कोरोनाची बाधा झाल्याची धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे. त्यामुळे या आरोपीच्या सहवासातील इतर २० सहआरोपी आणि २३ पोलीस कर्मचाऱ्यांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. या सर्वांचे सॅब नमुने घेण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. कोरोनाबाधित रुग्ण आढळल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे. १६

अधिक वाचा...

असा असेल नवा लॉकडाऊन…

लॉकडाऊन संपायला दोन दिवस राहिले असतानाच सरकारने आणखी दोन आठवड्यांनी त्यात वाढ केली आहे. त्यामुळे हा लॉकडाऊन आता १७ मेपर्यंत चालणार आहे. यावेळी सरकारने त्यात काही सुटही दिली आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाने याबाबत पत्रक काढून ही माहिती दिली आहे. रेड, ऑरेंज आणि ग्रीन झोन संदर्भात वेगवेगळे नियम करण्यात आले असून रेड

अधिक वाचा...

उद्धव ठाकरे यांच्या विधिमंडळ सदस्यत्वाचा अडथळा मोकळा होणार; विधानपरिषद निवडणूक २१ मे रोजी

उद्धव ठाकरे यांच्या विधिमंडळ सदस्य होण्याच्या मार्गातील अडथळ्यांमुळे जी अनिश्चितता आणि राजकीय घालमेल, शह-काटशहाचं राजकारण रंगलं त्याला केंद्रीय निवडणूक आयोगाने पूर्णविराम दिला आहे. राज्यामध्ये विधानपरिषदेच्या ९ जागांवर निवडणुका घेण्यास आयोगाने हिरवा कंदील दाखवला असून २१ मे रोजी ह्या निवडणुका होणार आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विधिमंडळ सदस्यत्त्वाचा मार्ग मोकळा

अधिक वाचा...