Home > विरार

वर्सोवा – विरार सागरी सेतूला अखेर मंजुरी

मुंबईत अनेक पायाभूत सुविधा प्रकल्पांचे नियोजन असून मुंबईकरांचा प्रवास सुलभ व्हावा या उद्देशाने वर्सोवा ते विरार सागरी सेतूला राज्य रस्ते विकास महामंडळाच्या गुरुवारी झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत अखेर मान्यता देण्यात आली. त्यामुळे वरळी येथून सुरू होणारा सागरी सेतू थेट विरारला जोडला जाईल.  सार्वजनिक बांधकाम मंत्री (सार्वजनिक उपक्रम) एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या

अधिक वाचा...

चिकन व करोनाचा काहीच संबंध नाही – उपायुक्त डॉ. प्रशांत कांबळे

चिकन आणि करोनाचा एकमेकांशी काहीच संबंध नाही. करोनाच्या संदर्भात चिकनबाबत पसरवलेले वृत्त चुकीचे असल्याने नागरिकांनी घाबरून जाण्याचे कारण नाही, असे पालघर जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. प्रशांत कांबळे यांनी म्हटले आहे. चीनमध्ये करोना विषाणूच्या थैमानात हजारो नागरिक मृत्युमुखी पडले आहेत. या पार्श्वभूमीवर सोशल मीडियावर काही चुकीच्या पोस्ट व्हायरल झाल्या असून त्यामुळे नागरिकांच्या मनात या रोगाविषयी

अधिक वाचा...

मनसे विरार शहर तर्फे पुलवामा हल्ल्यात शहिद झालेल्या वीरांना श्रद्धांजली अर्पण

महाराष्ट्र नवनिर्माण सेना विरार शहर तर्फे पुलवामा हल्ल्यात शहिद झालेल्या वीरांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. सदर श्रद्धांजली कार्यक्रम कारगिल नगर जनसंपर्क कार्यालयाद्वारे विरार पूर्व रेल्वे स्थानक भुयारी मार्ग येथे आयोजित करण्यात आला होता.

अधिक वाचा...