fbpx
Home > ठळक बातम्या > प्रसिद्ध अभिनेते इरफान खान यांचं निधन

प्रसिद्ध अभिनेते इरफान खान यांचं निधन

बॉलिवूड अभिनेता इरफान खान यांचं निधन झालं. वयाच्या 54 व्या वर्षी मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. इरफान खान यांला न्यूरोएन्डोक्राइन ट्यूमर नावाचा आजार होता. परंतु काल अचानक प्रकृती बिघडल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. आयसीयूमध्ये त्यांच्यावर उपचार सुरु होते. परंतु आज ते मृत्यूझी झुंज हरले. त्यांच्या निधनाने संपूर्ण बॉलिवूडवर शोककळा पसरली आहे.

चित्रपट निर्माते शूजित सरकार यांनी इरफान खान यांच्या निधनाची बातमी दिली. त्यांनी ट्वीट करुन इरफान खान यांचं निधन झाल्याचं सांगितलं. त्यांनी लिहिलं आहे की, “माझा प्रिय मित्र इरफा… तू लढलास. मला तुझा अभिमान आहे. आपण पुन्हा भेटू. स्तुपा आणि बाबिल यांचं सांत्वन.. तुम्ही सुद्धा लढलात. या लढाईत तू शक्य तेवढं केलंस. तुझ्या आत्म्याला शांती मिळो…इरफान खान सलाम.”

इरफान खान यांनी १६ मार्च २०१८ मध्ये आपल्या आजाराविषयी खुलासा केला होता. “मला ‘न्यूरोएन्डोक्राईन ट्यूमर’ झाल्याचे समजले. सध्या तरी कठीण झाले आहे. पण माझ्यासोबत असलेल्या व्यक्तींचे प्रेम आणि सामर्थ्यामुळे माझ्यात आशेचा किरण निर्माण झाला आहे. मला उपचारांसाठी परदेशात जावे लागणार आहे. मला शुभेच्छा पाठवत राहा, अशी विनंती करतो,” असं इरफान खान यांनी म्हटलं होतं.

त्यानंतर आजारावरील उपचारांसाठी ते परदेशात गेले होते. उपचार पूर्ण झाल्यानंतर दहा महिन्यांनी इरफान खान मायदेशी परतले होते. आपल्या आजारातून सावरत त्यांनी ‘अंग्रेजी मीडियम’ या चित्रपटाचे चित्रीकरणही पूर्ण केले होते. हाच त्यांचा अखेरचा चित्रपट ठरला. भारत सरकारने त्यांना पद्मश्री या नागरी पुरस्काराने सन्मानित केलं होतं.

इरफान खान यांचं खरं नाव साहबजादे इरफान अली खान यांचा जन्म जयपूर येथे ७ जानेवारी १९६७ मध्ये झाला. एम.ए. करत असताना त्यांना दिल्लीतील ‘नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा’ची शिष्यवृत्ती मिळाली. भारत सरकारने २०११ साली त्यांना पद्मश्री पदवी देऊन त्यांच्या कार्याचा गौरव केला. २००३ मध्ये हासिल या चित्रपटातील भूमिकेसाठी फिल्मफेअरचा सर्वोत्तम खलनायक पुरस्कार देण्यात आला तर २००७ मध्ये लाईफ इन मेट्रो चित्रपटासाठी फिल्मफेअर सर्वोत्तम साहाय्यक अभिनेता पुरस्कार व २०१२ मध्ये पानसिंग तोमर चित्रपटाकरिता सर्वोत्कृष्ट अभिनेताचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार देण्यात आला.

इरफान खान यांचे प्रमुख हिंदी / इंग्रजी चित्रपट

 • ॲसिड फॅक्टरी (इंग्रजी)
 • एक डॉक्टर की मौत
 • ज्युरासिक वर्ल्ड (इंग्रजी)
 • द अमेझिंग स्पायडरमॅन (इंग्रजी)
 • द वॉंरियर (इंग्रजी)
 • नेमसेक (इंग्रजी)
 • पानसिंग तोमर
 • मकबूल
 • रोग
 • रोड टु लडाख (लघुपट)
 • लाईफ ऑफ पाय (इंग्रजी)
 • लाईफ इन मेट्रो (इंग्रजी)
 • सच अ लॉंग जर्नी (इंग्रजी)
 • सलाम बॉंबे
 • स्लमडॉग मिलेनियर (इंग्रजी)
 • हासिल

प्रमुख दूरचित्रवाणी मालिका

 • चंद्रकांता
 • चाणक्य
 • डर
 • भारत एक खोज
 • द ग्रेट मराठा (रोहिला सरदार नजीब-उद-दौलाच्या भूमिकेत)

अशा या अष्टपैलू कलाकाराला वसई पालघर आणि वाचकांतर्फे भावपूर्ण श्रद्धांजली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *