fbpx
Home > ठळक बातम्या > असा असेल नवा लॉकडाऊन…

असा असेल नवा लॉकडाऊन…

लॉकडाऊन संपायला दोन दिवस राहिले असतानाच सरकारने आणखी दोन आठवड्यांनी त्यात वाढ केली आहे. त्यामुळे हा लॉकडाऊन आता १७ मेपर्यंत चालणार आहे. यावेळी सरकारने त्यात काही सुटही दिली आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाने याबाबत पत्रक काढून ही माहिती दिली आहे. रेड, ऑरेंज आणि ग्रीन झोन संदर्भात वेगवेगळे नियम करण्यात आले असून रेड झोनसाठी अतिशय कमी तर ग्रीन झोनसाठी सर्वात जास्त मोकळीक दिली आहे.

याबाबत केंद्र सरकारने गाईडलाईन दिली असली तरी त्यात सुधारणा करण्याचा अधिकार राज्य सरकारला आहे. स्थानिक गरजा लक्षात घेऊन त्यात बदल करण्याचा अधिकार स्थानिक सरकारला असणार आहे. अत्यावश्यक सेवा पूर्वीप्रमाणेच सुरू राहणार आहेत.

रेल्वे सेवा, हवाई वाहतूक, मेट्रो, सार्वजनिक वाहतूक, सर्व शैक्षणिक संस्था, शाळा, कॉलेजेस, मॉल, सिनेमा हॉल आणि स्पोर्ट्स क्लब १७ मेपर्यंत बंद राहणार आहेत. तर ग्रीन झोनमध्ये ५० टक्के क्षमतेनेच प्रवासी वाहतूक सुरू राहणार

यामध्ये दारूची दुकानं आणि पान शॉप्स सुरू ठेवण्याबाबत सरकार विचार करत आहे. सोशल डिस्टन्सिंगचं पालन करत यासाठी परवानगी दिली जाण्याची शक्यता आहे. संध्याकाळी ७ ते सकाळी ७ पर्यंत वाहतूक बंद राहणार. बस डेपोमध्ये ५० टक्केच कर्मचारी काम करणार

या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या सकाळी १० वाजता देशवासियांशी पुन्हा एकदा संवाद साधणार आहेत. पंतप्रधान काय बोलतील, कुठल्या घोषणा करतील याकडे सगळ्याचं लक्ष लागलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *