fbpx
Home > इतर घडामोडी > डहाणू-वैतरणा प्रवासी सेवाभावी संस्थेच्या शिष्टमंडळाने प्रवाशांच्या विविध मागण्यांसाठी घेतली खासदार राजेंद्र गावीत यांची भेट

डहाणू-वैतरणा प्रवासी सेवाभावी संस्थेच्या शिष्टमंडळाने प्रवाशांच्या विविध मागण्यांसाठी घेतली खासदार राजेंद्र गावीत यांची भेट

डहाणू-वैतरणा प्रवासी सेवाभावी संस्थेच्या शिष्टमंडळाने पश्चिम रेल्वेवरील प्रवाशांच्या विविध मागण्यांसाठी खासदार राजेंद्र गावीत यांची भेट घेऊन निवेदन दिले.

शिष्टमंडळाने सादर केलेल्या मागण्या खालीलप्रमाणे

विरार लोकलमध्ये रुपांतरित करण्यात आलेली ९३०२७ ही डहाणू लोकल पुन्हा डहाणू लोकलमध्ये रुपांतरित करणे

९३०२८ ही डहाणू-विरार लोकल अंधेरीपर्यंत नेणे व ९३०३५ ही सध्या विरारवरून डहाणूसाठी सुटणारी लोकल अंधेरीहून सोडणे

५९४४१ व ५९४४२ या दोन्ही विरमगाम पॅसेंजर गाड्यांना वैतरणा स्थानकात थांबा देणे

पालघर आणि बोईसर स्थानकात एस्कलेटर बसवणे

डहाणू स्थानकातील ४ आणि ५ क्रमांकाचे प्लॅटफॉर्म १५ डब्यांच्या गाडीच्या लांबीप्रमाणे विस्तारित करणे

पालघर आणि बोईसर स्थानकात मेल-एक्स्प्रेस गाड्यांच्या डब्यांची स्थिती कळण्यासाठी कोच इंडिकेटर्स बसवणे

या सर्व मागण्यांसंदर्भात खासदारांशी चर्चा करण्यात आली. या मागण्यांसंदर्भात त्वरित कारवाई करावी, अशा आशयाचे पत्र खासदार राजेंद्र गावित यांनी पश्चिम रेल्वेचे जनरल मॅनेजर ए. के. गुप्ता यांना तातडीने कारवाई करण्यासाठी जारी केले. या प्रसंगी डहाणू वैतरणा प्रवासी सेवाभावी संस्थेचे सहसचिव प्रथमेश प्रभूतेंडोलकर व नागदेव पवार उपस्थित होते. या प्रसंगी पश्चिम रेल्वेचे झेआरयूसीसीचे सदस्य सदानंद पावगी तसेच, शिवसेनेचे तालुका प्रमुख विकास मोरे व हिमांशू वर्तक, विराग म्हात्रे, हृदयनाथ म्हात्रे आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *