fbpx
Home > इतर घडामोडी > नवीन वाहतूक नियम

नवीन वाहतूक नियम

रस्ते अपघातात दरवर्षी लाखो लोकांना आपले प्राण गमवावे लागतात. अपघातामध्ये दगावणाऱ्यामध्ये तरुणांची संख्या सर्वाधिक आहे. हे लक्षात घेता वाहनधारकांवर वचक बसावी म्हणून वाहतूक नियम अधिक कडक करून वाहतुकीला शिस्त लावणे आणि अपघाताचे प्रमाण कमी करण्यासाठी नवीन वाहतूक नियम १ सप्टेंबर पासून अंमलात आणले आहे. वाहतुकीचा नियम भंग केल्यास खालील प्रमाणे दंड आकारण्यात येणार आहे असे पालघर पोलीस आयुक्त गौरव सिंग यांनी परिपत्रक जाहीर करून नियमांचे पालन करण्याचे आवाहन त्यांनी केले.

 • रस्ते नियमांचा भंग – रु. ५००
 • प्रशासनाचा आदेश भंग – रु. २,०००
 • परवाना नसलेले वाहन चालविणे – रु. ५,०००
 • पात्र नसताना वाहन चालविणे – रु. १०,०००
 • वेगमर्यादा तोडणे – रु. २,०००
 • धोकादायक वाहन चालविणे – रु. ५,०००
 • दारू पिऊन वाहन चालविणे – रु. १०,०००
 • वेगवान वाहन चालविणे – रु. ५,०००
 • विनापरवाना वाहन चालविणे – रु. १०,०००
 • सीटबेल्ट नसणे – रु. १,०००
 • दुचाकीवर दोनपेक्षा जास्त व्यक्ती – रु. २,०००
 • अँब्युलन्स सारख्या महत्त्वाच्या वाहनांना रस्ता न देणे – रु. १०,०००
 • विमा नसताना वाहन चालविणे – रु. २,०००
 • अल्पवयीन मुला – मुलींकडून गुन्हा झाल्यास मालक – पालक दोषी – रु. २५,००० व ३ वर्ष तुरुंगवास
 • विना हेल्मेट – रु. १,००० व ३ महिने वाहतूक परवाना रद्द

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *