fbpx
Home > इतर घडामोडी > पालघर मधील रुग्णालयात प्रशिक्षणार्थी महिला डॉक्टरची रॅगिंग

पालघर मधील रुग्णालयात प्रशिक्षणार्थी महिला डॉक्टरची रॅगिंग

पालघरमधील एका रुग्णालयात प्रशिक्षणार्थी महिला डॉक्टरची वरिष्ठांकडून रॅगिंग करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी पीडितेनं वरिष्ठ डॉक्टरांविरोधात तक्रार दाखल केली आहे. पालघर पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, पालघर शहरात बोईसर राज्य महामार्गाजवळ एम. एल. ढवळे ट्रस्टचं रुग्णालय आहे. या रुग्णालयात दोन ते तीन दिवसांपूर्वी तक्रारदार प्रशिक्षणार्थी डॉक्टर महिला रुजू झाली होती. प्रशिक्षणासाठी आलेल्या या महिलेची वरिष्ठ डॉक्टरांशी ओळख करून देण्यात येत होती. त्याचवेळी त्यांनी आपला मानसिक छळ केला, असा आरोप या डॉक्टर महिलेने केला आहे. या प्रकरणी पीडित महिला डॉक्टरने १५ वरिष्ठ डॉक्टरांविरोधात पालघर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पालघर पोलिसांनी घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन त्यांच्याविरोधात रॅगिंग प्रतिबंध कायद्यान्वये गुन्हा नोंदवला असून पुढील तपास सुरू आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *