fbpx
Home > अपघात > वसईजवळ समुद्रात बोट उलटली; एकाचा मृत्यू

वसईजवळ समुद्रात बोट उलटली; एकाचा मृत्यू

वसईच्या रानगाव येथून कोशापीरा बेटावर समुद्रावर फिशिंगसाठी गेलेल्या तरुणांची बोट उलटल्याची घटना शुक्रवार ३ जानेवारी रोजी दुपारी घडली आहे. यात गिरीजच्या स्टिवन कुटिनो या ३७ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची माहिती हाती आली आहे.

शुक्रवारी सकाळी ६च्या सुमारास वसई, गिरिज येथे राहणा-या सहा मित्रांचा ग्रुप फिशिंगसाठी साधी बोट आणि एक मशीनची अशा दोन बोट घेऊन रानगावहून समुद्रात निघाला होता. समुद्रात फिशिंग करून झाल्यानंतर दुपारी तीनच्या सुमारास कोशापीरा येथून परतत असताना लाटेच्या तडाख्यामुळं साधी बोट समुद्रात पलटी झाली. दुसऱ्या बोटीत असलेल्या मित्रांनी या तिघांना वाचविण्याचा प्रयत्न केला असता दोघांना वाचवण्यात यश आले. मात्र स्टिवन कुटिनो या तरुणाचा यात दुर्देवी मृत्यू झाला आहे. तर आशुतोष या तरुणाच्या पोटात पाणी गेल्याने त्याला उपचारांसाठी वसईच्या डि.एम. पेटिट रुग्णाल्यात दाखल करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *