fbpx
Home > इतर घडामोडी > ‘कॉल गर्ल’साठी फोन केला पण स्वतःच्याच बायकोचा फोटो आला

‘कॉल गर्ल’साठी फोन केला पण स्वतःच्याच बायकोचा फोटो आला

मसाज करण्यासाठी फोनवरून कॉल गर्लची चौकशी करणं पालघरमध्ये राहणाऱ्या ३० वर्षीय तरुणाला चांगलंच महागात पडलं आहे. त्याने मसाजसाठी कॉल गर्लची चौकशी केल्यानंतर समोरच्या व्यक्तीने तरुणाच्या पत्नीचा फोटो एडिट करून सेक्स वर्करच्या पेशात एका डेटिंग अ‍ॅपवर टाकल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, व्यवसायाने ज्वेलरी डिझायनर असणाऱ्या व पालघरमध्ये राहणाऱ्या एका तरुणाने १४ डिसेंबरला मसाज सेवेच्या चौकशीसाठी एका व्यक्तीला फोन केला. त्यानंतर समोरच्या व्यक्तीने या तरुणाकडे थेट ५० हजार रुपयांची मागणी केली. इतके पैसे देणं शक्य नसल्याने त्या तरुणाने नकार दिला. मात्र पैशासाठी त्याला ब्लॅकमेल करण्यासाठी समोरच्या व्यक्तीने थेट तरुणाच्या सोशल मीडिया अकाउंटवर जात त्याच्या पत्नीचा फोटो घेतला. हा फोटो एका पॉर्नस्टारच्या फोटोसोबत मॉर्फ करून एका डेटिंग अ‍ॅपवर प्रसिद्ध केला. पीडित तरुणाला १६ डिसेंबरला व्हॉट्सअ‍ॅपवर एका डेटिंग अ‍ॅपची लिंक मिळाली. या लिंकमध्ये चक्क त्या तरुणाच्या पत्नीचा एका पॉर्नस्टारच्या फोटोसोबत मॉर्फ केलेला फोटो होता. तसंच तिचा उल्लेख सेक्स वर्कर असा केलेला होता.’

आरोपीला पकडण्यासाठी पोलिसांनी हालचाली सुरू केल्या आहेत. ‘आम्ही आता तो मोबाईल नंबर ट्रॅक करत आहोत, ज्यावरून आरोपीने पीडित तरुणाला डेटिंग अ‍ॅपची लिंक पाठवली होती. हा आरोपी ऑनलाइन सेक्स चॅट आणि सेक्स वर्कर सर्च करणाऱ्या टोळीत सहभागी असल्याचा आम्हाल संशय आहे. अशी टोळी तरुणांनी फोन केल्यानंतर त्यांना ब्लॅकमेल करून त्यांच्याकडे पैस उकळते,’ अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *