fbpx
Home > अपघात > तारापूर एमआयडीसीत भीषण स्फोट; ५ ठार

तारापूर एमआयडीसीत भीषण स्फोट; ५ ठार

पालघर जिल्ह्यात बोईसर येथे तारापूर एमआयडीसीत शनिवारी सायंकाळी भीषण स्फोट झाला. या स्फोटात ५ जण मृत्युमुखी पडले आहेत तर सात जण गंभीर जखमी झाले आहेत. स्फोटाचा हादरा इतका मोठा होता की आसपासचा १० ते १५ कि.मी. चा परिसर हादरला. मृतांमध्ये कंपनीच्या मालकाचाही समावेश आहे. स्फोटाच्या हादऱ्यामुळे कंपनीच्या आवारातील एक इमारत कोसळली आहे. काही कामगार ढिगाऱ्याखाली अडकले आहेत. दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या अपघातातील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे.

बोईसर औद्योगिक वसाहतीमधील एम-२, या प्लॉटमधील कारखान्यात संध्याकाळी पावणे सातच्या सुमारास सुमारास भीषण स्फोट झाला आहे. हा कारखाना या पूर्वी तारा नाईट्रेट या नावाने ओळखला जात होता, या स्फोटामुळे कंपनीच्या आवारतील एक इमारत देखील कोसळी आहे, या कंपनीतील स्फोटानंतर अवशेष लगतच्या काही कारखान्यात उडाल्याने मोठ्या प्रमाणात हानी झाली आहे. या कंपनीमध्ये हे अमोनिअम नायट्रेट हे स्फोटक रसायन बनवले जात असल्याचे सांगण्यात येत असून या स्फोटाचा आवाज २२ ते २५ किलोमीटर अंतरापर्यंत ऐकू गेल्याचे नागरिकांकडून सांगण्यात आले.

एमआयडीसीतील एका केमिकल कंपनीत हा स्फोट झाला. स्फोटाचा कारण अद्याप कळू शकलेलं नाही. स्फोटामुळे लागलेली आग आसपासच्या दोन-तीन कंपन्यांपर्यंत पसरली आहे. मृतांमध्ये, कंपनीचे मालक नटुभाई पटेल यांचाही समावेश आहे. तारापूर गावातील कोलवडे गावात ही कंपनी आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *