fbpx
Home > ठळक बातम्या > पेट्रोल आणि डिझेल पुन्हा एकदा महागलं

पेट्रोल आणि डिझेल पुन्हा एकदा महागलं

पेट्रोल-डिझेलचे दर काही केल्या कमी होताना दिसत नाहीत. मुंबईत उच्चांक गाठलेल्या पेट्रोल दराने आजही आगेकूच कायम ठेवली आहे. मुंबईतील आजचा पेट्रोल दर ८६.७२ रुपये प्रति लिटर इतका आहे. गेल्या चार दिवसात मुंबईतील पेट्रोल दरात १ रुपये ६२ पैसे इतकी वाढ झाली आहे. महाराष्ट्रात सर्वात महाग पेट्रोल अमरावतीत मिळतं. अमरावतीत एक लिटर पेट्रोलसाठी ८७.९७ रुपये मोजावेल लागत आहेत.

मुंबईत रविवारी पेट्रोलसाठी लिटरमागे तब्बल ८६.२५ रुपये मोजावे लागले होते, काल सोमवारी पेट्रोलने त्यापुढे म्हणजेच ८६.५६ रुपयांपर्यंत मजल मारली. आजही ही आगेकूच कायम राहात पेट्रोल ८६.७२ रुपयांपर्यंत पोहोचलं. पेट्रोलचा हा मुंबईतील आजपर्यंतचा सर्वोच्च दर आहे.

दुसरीकडे डिझेलही पेट्रोल दराला गाठत आहे. कारण पेट्रोलने नवा उच्चांक गाठल्यानंतर डिझेलनेही आगेकूच कायम ठेवली. मुंबईतील डिझेलचा प्रतिलिटर दर ७५.७४ रुपये इतका आहे.

महत्त्वाच्या शहरातील पेट्रोलचे दर

मुंबई – ८६.७२

पुणे – ८६.५२

ठाणे – ८६.८०

नाशिक – ८७.१०

औरंगाबाद – ८७.७६

नागपूर – ८७.२०

कोल्हापूर – ८६.९०

सोलापूर – ८७.७७

अमरावती – ८७.९७

सिंधुदुर्ग – ८७.६३

अहमदनगर – ८६.५७

आंतरराष्ट्रीय बाजाराचा फटका

आंतरराष्ट्रीय बाजारात क्रूड ऑईलच्या किमतीतील चढ-उतारामुळे, भारतातील इंधनाचे दर वाढत आहेत, असं पेट्रोल डिलर फेडरेशन ऑफ महाराष्ट्रचे उदय लोध यांनी सांगितलं.

शिवाय डॉलरच्या तुलनेत रुपयाचं अवमूल्यन होत असल्याने त्याचा थेट परिमाणही पेट्रोल-डिझेलच्या दरावर होत असल्याचं लोध म्हणाले. सरकारने एक्साईज ड्युटी आणि अन्य करात कपात करणं गरजेचं आहे, तरच इंधनाचे दर आटोक्यात येतील, असं ते म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *