fbpx
Home > ठळक बातम्या > पालघर साधू हत्याकांड प्रकरणी आणखी २४ जणांना अटक

पालघर साधू हत्याकांड प्रकरणी आणखी २४ जणांना अटक

गुन्हे अन्वेषण विभागाकडून मंगळवारी पालघर हत्याकांड प्रकरणी आणखी २४ जणांना अटक केलं. संपूर्ण देशाला हादरवणाऱ्या हत्याकांडामध्ये सहभाग असल्याच्या आरोपातून त्यांना ताब्यात घेण्यात आलं आहे. मॉब लिंचिंगमध्ये दोन साधु व त्यांच्या चालकाची अमानुष हत्या केल्याप्रकरणी त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे.

आतापर्यंत या प्रकरणाअंतर्गत जवळपास १३३ जणांना ताब्यात घेतलं आहे. अटक करण्यात आलेल्या १३३ जणांमध्ये ९ अल्पवयीनही समाविष्ट आहेत. पालघर प्रकरणाला चालना मिळताच तातडीने त्यावर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले. ज्यामध्ये पालघरच्या पोलीस अधीक्षकांना सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आले होते तसेच पाच पोलीसांचे निलंबन व पोलीस दलात कार्यरत असणाऱ्या ३५ कर्मचाऱ्यांची तातडीने बदलीही करण्यात आली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *