fbpx
Home > इतर घडामोडी > उमेदवारांविरुद्ध तक्रार करण्यासाठी निवडणूक आयोगाचा cVIGIL अॅप कार्यान्वित

उमेदवारांविरुद्ध तक्रार करण्यासाठी निवडणूक आयोगाचा cVIGIL अॅप कार्यान्वित

लोकसभा निवडणुका व्यवस्थित पार पडाव्यात म्हणून निवडणूक आयोगाने जोरदार तयारी केली आहे. मतदारसंघात होत असलेल्या गुन्ह्याची, अफरातफरीची, नियमांचे उल्लंघन करण्याची माहिती आयोगाला प्राप्त व्हावी यासाठी आयोगाने cVIGIL हा मोबाइल अॅप लाँच केला आहे. 

निवडणूक आयोगाच्या या अॅपवर मतदारांना तक्रार करता येणार आहे. तक्रार केल्यानंतर १०० मिनिटांच्या आत यावर निवडणूक आयोग कारवाई करणार आहे. मतदारांची उमेदवारांविषयी तक्रार असल्यास ते या अॅपवर फोटो आणि व्हिडिओ सुद्धा पाठवू शकणार आहेत. गुगल प्लेस्टोरमधून cVIGIL हा अॅप डाउलोड केल्यानंतर या अॅपमध्ये मोबाइल नंबरसह काही माहिती भरावी लागेल. त्यानंतर याची अधिकृत नोंदणी होईल. या अॅपमधून सरळ फोनचा कॅमेरा ओपन करून व्हिडिओ रेकॉर्डही करू शकता किंवा फोटो क्लिक करून तो निवडणूक आयोगाला पाठवण्याची सोय या अॅपमध्ये आहे. 

अॅप डाउलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

https://play.google.com/store/apps/details?id=in.nic.eci.cvigil&hl=en_US

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *