fbpx
Home > इतर घडामोडी > रेल्वेचा दरवाजा अडविल्याच्या विरोधात दिवा स्थानकात महिलांचा रेल्वे रोको

रेल्वेचा दरवाजा अडविल्याच्या विरोधात दिवा स्थानकात महिलांचा रेल्वे रोको

इतर महिला प्रवासी दरवाजा अडवून ठेवतात त्यामुळे इतर महिला प्रवाशांना रेल्वेमध्ये चढता येत नाही म्हणून मध्य रेल्वेवरील दिवा स्थानकात संतप्त महिला प्रवाशांनी रेल्वे रोको केला. पोलिसांनी मध्यस्थी केल्यानंतर लोकल मार्गस्थ झाली. या प्रकारामुळं मध्य रेल्वेची वाहतूक काही वेळ विस्कळीत झाली होती. 

कर्जत, कसारा येथून सुटणाऱ्या जलद लोकल दिवा स्थानकात थांबतात. मात्र, काही प्रवासी लोकलचा दरवाजा अडवून ठेवतात. त्यामुळं दिवा स्थानकात लोकलमध्ये प्रवाशांना चढता येत नाही. दिवा स्थानकातील फलाट क्रमांक ४ वर गुरुवारी सकाळी असाच प्रकार घडला. सकाळी ६.५६ मिनिटांनी मुंबईकडे जाणारी जलद लोकल दिवा स्थानकात आली असता, महिला डब्यातील काही प्रवाशांनी दरवाजा अडवून ठेवला होता. दिवा स्थानकातील महिलांना डब्यात चढता आलं नाही. या प्रकारानं सतप्त झालेल्या महिलांनी दरवाजात उभ्या असलेल्या महिलांना खाली खेचलं. त्यानंतर घडलेला प्रकार मोटरमनच्या कानावर घातला. काही महिला प्रवासी थेट रुळांवर उतरल्या आणि लोकल रोखून धरण्याचा प्रयत्न केला. जवळपास १० ते १५ मिनिटे लोकल थांबवून ठेवली. परिणामी मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली. पोलिसांनी हस्तक्षेप केल्यानंतर महिला रुळांवरून बाजूला झाल्या आणि लोकल मुंबईकडे मार्गस्थ झाली. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *