fbpx
Home > आरोग्यविषयक > देहमुक्ती मिशनचे पुरुषोत्तम पवार यांच्यामुळे वसई-विरारमध्ये रुजतेय नेत्रदानाची चळवळ

देहमुक्ती मिशनचे पुरुषोत्तम पवार यांच्यामुळे वसई-विरारमध्ये रुजतेय नेत्रदानाची चळवळ

जगामध्ये अंध व्यक्तींची वाढत चाललेली संख्या आणि नेत्रदान करणाऱ्यांची संख्या यामधील तफावत वाढतच आहे. त्यातच नेत्रदानाबाबत गैरसमजुती आहेत; त्याबाबत जनजागृती करण्याची आवश्यकता सर्व ठिकाणी असताना दुसरीकडे पालघर जिल्ह्यामधील वसई-विरारमध्ये सर्वसामान्य लोक स्वतःहून नेत्रदानात पुढे येऊ लागले आहेत. याचे कारण वसईमध्ये देहमुक्ती मिशन मार्फत पुरुषोत्तम पवार यांनी सुरू केलेली चळवळ. वसईमधील ही चळवळ हळूहळू मुंबईपर्यंत पसरली व आता पुरुषोत्तम पवार यांनी द फेडरेशन ऑफ ऑर्गन अँड बॉडी डोनेशन या संस्थेमार्फत संपूर्ण महाराष्ट्रभर ही चळवळ पसरवण्याचा चंग बांधला आहे.

वसई-विरार भागांमध्ये नेत्रपेढी नाही. नेत्रदानाबद्दल तंत्रशुद्ध माहिती देणारे कोणी उपलब्ध नव्हते. परंतु ही गरज देहमुक्ती मिशन या संस्थेत पुरुषोत्तम पवार यांच्यामार्फत पूर्ण झाली व ही चळवळ वसईत रुजू लागली. अनेक विविध समाजाची लोक वसईमध्ये राहत असताना प्रत्येक समाजाच्या लोकांनी ही माहिती समजून घेतली व त्याला सकारात्मक पाठिंबा द्यायला सुरुवात केली. ख्रिस्ती समाजाचे बाहुल्य असलेल्या वसईमध्ये तर सर्व चर्चेच्या धर्मगुरूंची भेट घेऊन त्यांना ही माहिती देण्यात पुरुषोत्तम पवार यशस्वी झाले. वसई तालुक्यातील जवळपास प्रत्येक चर्चमध्ये एक-एक दोन-दोन वेळा याबद्दलची जागृतिपर व्याख्याने आयोजित करण्यात आली व आजही येत आहेत. त्यामुळे लोकांनी याची प्रक्रिया नीट समजावून घेऊन आत्मसात केली. धर्मगुरूंनी पाठिंबा दिल्यामुळे समाजातील सर्व लोकांनी देहदान नेत्रदानासाठी पुढे यायला सुरुवात केली. अनेक ठिकाणी तरुणही पुढाकार घेऊन स्वतः कार्यकर्ते बनवून व कुठेही मृत्यू झाला असल्यास त्या ठिकाणी जाऊन मृताच्या कुटुंबीयांना नेत्रदानाबद्दल माहिती देऊन नेत्रदानासाठी प्रवृत्त करू लागले.

ही चळवळ वसईच्या संस्कृतीतील एक परंपरागत भाग म्हणून स्वीकृत झालेली आहे किंवा ही परंपरा सुरू झालेली आहे. सर्व जाती धर्मातील धर्मगुरूंचा व तरुणांचा सहभाग हे वसईतील वसईतील नेत्रदान चळवळीचे यश आहे. जगामध्ये नेत्रपटल म्हणजेच कोरिया एक्सपोर्ट करणारा श्रीलंका हा एक नंबरचा देश आहे. भारतासमोर त्याची लोकसंख्या व आकारमान नगण्य असून सुद्धा शरमेची बाब अशी की भारतामध्ये श्रीलंकेकडून नेत्रपटल आयात केले जातात. मात्र भारतीय मृत व्यक्तींचे डोळे आणि शरीर हे आगीच्या किंवा भूमीच्या आगीच्या भक्ष्यस्थानी घालतो किंवा भूमीमध्ये दफन करतो. केंद्र सरकारकडून पर्यावरण दिन, स्वच्छता दिन, रक्तदान पंधरवडा असे साजरे केले जातात. त्याप्रमाणे जर नेत्रदानाचा पंधरवडा साजरा करायचे ठरवले तर पंधरावा दिवस उजाडणार नाही. फक्त बारा दिवसात भारतातले सर्व अंध नाहीसे होतील व भारतातला अंधकार दूर होईल. वसई-विरार भागात जोर धरलेली चळवळ आणि तिचा पॅटर्न जर महाराष्ट्रात आणि भारतात सर्व ठिकाणी अवलंबायला गेला तर श्रीलंकेची बरोबरी करायला वेळ लागणार नाही, असे पुरुषोत्तम पवार यांनी महाराष्ट्र टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत सांगितले.

नेत्रदानासाठी पुढाकार

रक्तदान श्रेष्ठदान असे मोठे मोठे बॅनर होर्डिंग शहराच्या मुख्य रस्त्यावर पूर्वी लावले जायचे. परंतु रक्तदान करण्यासाठी सर्वसामान्य जणांनी त्याचा स्वीकार केल्यामुळे आता अशा प्रकारच्या जाहिराती करण्याची गरज राहिली नाही. लोक सर्रास रक्तदान करण्यास पुढे येऊ लागले आहेत. त्याचप्रमाणे नेत्रदान करण्यासाठीही आपले आद्य कर्तव्य समजून वसई विरारमधील तरुण मंडळी पुढे येऊ लागली असल्याचे पवार यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *