fbpx
Home > अपघात > मुंबईच्या तरुणीचा वाडामध्ये पुरात वाहून मृत्यू

मुंबईच्या तरुणीचा वाडामध्ये पुरात वाहून मृत्यू

वाढदिवसाच्या दिवशीच मृत्यूचा घाला

वाढदिवसाच्या निमित्ताने वाडा तालुक्यातील कोहोज किल्ल्यावर पर्यटनासाठी आलेल्या, मुंबईतील बोरिवली येथील पिंकल रुपेनभाई शहा (२१) या तरुणीचा पुरात वाहून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली.

महाराष्ट्र टाईम्सने दिलेल्या बातमीनुसार पिंकल हिचा २९ जुलै रोजी वाढदिवस होता. वाढदिवस साजरा करण्याच्या निमित्ताने पिंकल ही वीरेंद्र घोरपडे, आकाश चर, ॲलन ॲल्विन व श्लोका पाताडे या मित्रमैत्रिणींसमवेत कोहोज किल्ल्यावर सोमवारी फिरायला आले होते.

वाढदिवस साजरा करून सायंकाळी साडेसहाच्या दरम्यान किल्ल्यावरून परतत असताना पायथ्याशी असलेल्या शेल्टे येथील बंधाऱ्यावरून पाय घसरून पडले. यावेळी पिंकल हिला सावरण्यास कोणताही आधार न मिळाल्याने ती पुराच्या पाण्यात वाहून गेल्याने तिचा मृत्यू झाला. उर्वरित तिघे हे झाडाच्या फांदी मिळाल्याने त्याआधारे कसेबसे पाण्यातून बाहेर येऊ शकले. पिंकलला वाढदिवसाच्या दिवशीच मृत्यूने गाठले. पिंकलचा मृत देह काही अंतरावर पाण्यात तरंगताना आढळून आला. या घटनेसंदर्भात वाडा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला असून या प्रकरणाचा अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक एच. बी. धनगर हे करत आहेत.पालघर जिल्ह्यात सध्या सर्वत्र मुसळधार पाऊस सुरू असल्याने नद्या, नाले व छोटे मोठे धबधबे ओसंडून वहात आहेत. त्यामुळे या धबधब्यांचा व पावसाचा आनंद लुटण्यासाठी पर्यटकांची गर्दी वाढत आहे. मात्र नदीनाल्यांच्या प्रवाहाचा अंदाज पर्यटकांना येत नसल्याने अशा दुर्दैवी घटना घडत आहेत. अशा दुर्दैवी घटना घडू नयेत म्हणून पालघरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील पर्यटनस्थळांवर जाण्यापासून मनाई आदेश काढला आहे. मात्र, हा मनाई आदेश मोडून पर्यटक धोक्याच्या पर्यटनस्थळी जात असल्याने प्रशासनाने अधिक कडक उपाययोजना करण्याची गरज स्थानिकांनी व्यक्त केली आहे.

पालघर जिल्ह्यात सध्या सर्वत्र मुसळधार पाऊस सुरू असल्याने नद्या, नाले व छोटे मोठे धबधबे ओसंडून वहात आहेत. त्यामुळे या धबधब्यांचा व पावसाचा आनंद लुटण्यासाठी पर्यटकांची गर्दी वाढत आहे. मात्र नदीनाल्यांच्या प्रवाहाचा अंदाज पर्यटकांना येत नसल्याने अशा दुर्दैवी घटना घडत आहेत. अशा दुर्दैवी घटना घडू नयेत म्हणून पालघरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील पर्यटनस्थळांवर जाण्यापासून मनाई आदेश काढला आहे. मात्र, हा मनाई आदेश मोडून पर्यटक धोक्याच्या पर्यटनस्थळी जात असल्याने प्रशासनाने अधिक कडक उपाययोजना करण्याची गरज स्थानिकांनी व्यक्त केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *