fbpx
Home > अपघात > वाडा येथे एसटीचा भीषण अपघात, ५२ प्रवासी जखमी

वाडा येथे एसटीचा भीषण अपघात, ५२ प्रवासी जखमी

आज सकाळी ७ वाजता पालघर जिल्ह्यातील वाडा-अघई महामार्गावरील जांभुळपाडा येथे चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने एसटीला भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. या अपघातात ५२ प्रवासी जखमी झाले असून दोघांची प्रकृती गंभीर आहे. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, वाडा आगाराची वाडा-पिवळी एमएच १४ बीटी २३३१ या क्रमांकाची एसटी आज सकाळी सात वाजण्याच्या सुमारास पिवळीहून वाड्याकडे येत होती. जांभुळपाडा येथे असलेल्या गतिरोधकावर चालक काशिनाथ जाधव याने जोराचा ब्रेक लावल्याने चालकाचा बसवरील ताबा सुटून बस थेट शेतात गेली. अपघात झाला त्यावेळी बसमधून ५२ प्रवासी प्रवास करत होते. जखमींमध्ये बहुसंख्य विद्यार्थी आहेत. रामनवमी प्रसाद (५०) सुमन प्रसाद (४५) यांच्या हात आणि पायाला फॅक्चर झाल्याने त्यांना पुढील उपचारासाठी ठाणे येथे हलविण्यात आले आहे. तर उर्वरितांवर वाडा येथील ग्रामीण व खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *