fbpx
Home > इतर घडामोडी > देशात कोरोनाचे रुग्ण दीड लाखाच्या वर…

देशात कोरोनाचे रुग्ण दीड लाखाच्या वर…

केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाकडून देशातील कोरोनाग्रस्त रुग्णांची ताजी आकडेवारी प्रसिद्ध करण्यात आली आहे. ज्यामध्ये मंगळवारी चोवीस तासांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या तब्बल ६३८७ ने वाढली आहे. तर एका दिवसांत एकूण १७० जणांचा कोरोनामुळं मृत्यू झाल्याची माहिती समोर आली.

एका दिवसात सहा हजारहून अधिक रुग्णांची वाढ झाल्यामुळं आता देशातील कोरोना रुग्णांचा एकूण आकडा १,५१,७६७ वर पोहोचला आहे. ज्यामध्ये ८३००४ रुग्णांवर अद्यापही रुग्णालयांमध्ये उपचार सुरु आहे. तर, तब्बल ६४,४२५ रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे.

आतापर्यंत देशभरात कोरोनाच्या संसर्गामुळं मृत्यू होणाऱ्यांचा आकडा ४३३७ वर पोहोचला असल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आली. देशात एकिकडे कोरोना रुग्णांची संख्या वाढत असली तरीही कोरोनतून सावरणाऱ्यांचा आकडा हा दिलासा देणारा आहे. ज्या आधारावर आतापर्यंत देशातील कोरोना रुग्णांचा रिकव्हरी रेट ४२.४५ टक्क्यांवर पोहोचला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *