fbpx
Home > आरोग्यविषयक > राज्यात कोरोनाबाधितांचा आकडा १०,४९८

राज्यात कोरोनाबाधितांचा आकडा १०,४९८

राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या १०,४९८ असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. दरम्यान, आज राज्यात २७ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आज झालेल्या मृत्यूंपैकी २० जण मुंबईचे तर ३ पुण्यातील आणि ठाणे शहरातील दोन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात आतापर्यंत ४५९ जणांचा मृत्यू झाला आहे. आज ५८३ कोरोनाबाधित रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

राज्यात आजपर्यंत पाठवण्यात आलेल्या १ लाख ४५ हजार ७९८ नमुन्यांपैकी १ लाख ३४ हजार २४४ जणांचे प्रयोगशाळा नमुने कोरोनाकरता निगेटिव्ह आले आहेत; तर १०,४९८ जण पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात १ लाख ६८ हजार २६६ व्यक्ती घरगुती अलगीकरणात (होम क्वॉरंटाईन) असून १० हजार ६९५ जण संस्थात्मक क्वॉरंटाईनमध्ये आहेत. आतापर्यंत १७७३ कोरोना बाधित रूग्णांना बरे झाल्यानंतर घरी सोडण्यात आले आहे.

दरम्यान पालघरमध्ये ४१ तर वसई विरार च्या पट्ट्यात १२८ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण झाले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *