fbpx
Home > समस्या-तक्रार > नालासोपारा पूर्व तुलिंज रोड वरील खोदकाम अद्याप पूर्ण नाही

नालासोपारा पूर्व तुलिंज रोड वरील खोदकाम अद्याप पूर्ण नाही

नालासोपारा पूर्व तुलिंज रोड येथे काही दिवसापूर्वी पाण्याची पाईप लाईन फुटली होती. महानगरपालिका ने ते काम केलं पण पालिका कर्मचाऱयांनी रोडवर खोदलेल्या ठिकाणी तात्पुरती माती टाकून ठेवली आहे. ह्या गोष्टीला ८ दिवस होत आहे पण अजूनही हा रोड बनविण्यात आलेला नाही. फक्त रोड खोदयच काम करता पण परत बनवत नाही. या खोदलेल्या रस्त्यामुळे पावसाळ्यात खूप अपघात होत आहे म्हणून कृपाय लवकरात लवकर रोड बनविण्याचे काम करावे ही विनंती.

प्रतीक शिंदे, नालासोपारा पूर्व

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *