fbpx
Home > आरोग्यविषयक > राज्यामध्ये २० हजाराच्यावर कोरोनाबाधित रुग्ण, ७७९ मृत्यू

राज्यामध्ये २० हजाराच्यावर कोरोनाबाधित रुग्ण, ७७९ मृत्यू

काल दिवसभरात राज्यात ११६५ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून यामध्ये ४८ जणांचा मृत्यू झाला आहे. त्याचप्रमाणे कोरोनाबाधित रुग्णांची संख्या २० हजार २२८ एवढी झाली आहे. तर राज्यभरात ३८०० रुग्ण कोरोनामुक्त झाल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. सर्वात जास्त १२ हजार ६८४ रुग्ण एकट्या मुंबईत असून वसई विरार क्षेत्रात एकूण २१६ तर पालघर मध्ये ३२ रुग्ण आहेत यामध्ये अनुक्रमे ९ आणि २ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

कालपर्यंत पाठविण्यात आलेल्या २ लाख २७ हजार ८०४ नमुन्यांपैकी २ लाख ०६ हजार ४८१ जणांचे प्रयोगशाळा नमुने निगेटिव्ह आले आहेत तर २० हजार २२८ जण पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात २ लाख ४१ हजार २९० लोक होम क्वारंटाइनमध्ये असून १३ हजार ९७६ लोक संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत. काल राज्यात ४८ कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे आत्तापर्यंत राज्यात मृत्यू झालेल्या कोरोना रुग्णांची संख्या ७७९ झाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *