fbpx
Home > आरोग्यविषयक > नालासोपारामध्ये तीन बोगस डॉक्टरांना अटक

नालासोपारामध्ये तीन बोगस डॉक्टरांना अटक

नालासोपारात बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट आहे असल्यामुळे महानगरपालिकेचे आयुक्त बळीराम पवार यांनी बोगस डॉक्टरांवर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार महानगरपालिकेच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी मोहीम हाती घेत बोगस डॉक्टरांवर कारवाई सुरू करत संतोष भवन परिसरातून तीन बोगस डॉक्टरांना अटक केली आहे. या यांच्यावर तुळींज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

याबाबतची माहिती अशी की, महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाला नालासोपारा पूर्वेकडील संतोष भवन परिसरातील वालई पाड्यात बोगस डॉक्टर काही कागदपत्रे नसताना आपले बस्तान मांडून बसल्याची माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांना मिळाली होती. त्यानुसार डॉ. सुधीर पांढरे, डॉ. स्वाती चिंचोळकर, डॉ. जगदीश महाजन, डॉ. अनया देव आणि डॉ. शाहीन शेख यांच्या पथकाने त्यांच्या क्लिनिकमध्ये धाडी टाकल्या. यामध्ये वालई पाडा येथील हरी ओम साई क्लिनिक दवाखाना उघडून बसलेल्या डॉ. संजयकुमार बीनदेश्वरी साहू (५०) आणि डॉ. सुनीता संजयकुमार साहू (४१) या पती-पत्नीकडे संबंधित कागदपत्रे नसल्यामुळे तुळींज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. तर, दुसऱ्या कारवाईत त्याच परिसरातील डॉ. सतीशकुमार सदानंद शर्मा (४१) याच्यावरही कारवाई करण्यात आली असून गुन्हा दाखल करण्यात आल्याचे तुळींज पोलिसांनी सांगितले. याबाबतचा पुढील तपास तुळींज पोलीस करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *