fbpx
Home > इतर घडामोडी > पाच हजार ११९ प्रवाशांना घेऊन ३ श्रमिक स्पेशल ट्रेन पालघर येथून रवाना

पाच हजार ११९ प्रवाशांना घेऊन ३ श्रमिक स्पेशल ट्रेन पालघर येथून रवाना

लॉकडाऊनमध्ये अडकलेल्या कामगारांना त्यांच्या मूळ राज्यात पाठविण्याच्या कामाला आता वेग आला आहे. उत्तर प्रदेश सरकारची परवानगी मिळाल्यानंतर बुधवारी पालघर येथून तीन श्रमिक स्पेशल गाड्यांना रवाना करण्यात आल्या. या श्रमिक स्पेशल ट्रेनने वाराणसी, जौनपूर आणि सुलतानपूरसाठी पाच हजार ११९ प्रवाशांना सोडले आहे. पालघरहून सुटणार्‍या श्रमिक स्पेशल ट्रेनमध्ये डहाणू रेल्वे स्थानकावर सुमारे ७०० प्रवासी बसले होते.

याबाबत आरपीएफचे वरिष्ठ निरीक्षक वसंत राय म्हणाले की, प्रवाश्यांची आरोग्य तपासणी केल्यानंतर त्यांना प्रवास करण्यास परवानगी देण्यात आली. ट्रेनमध्ये जाताना लोकांच्या चेहऱ्यावर हास्य उमटले. यावेळी स्थानिक प्रशासन, रेल्वे प्रशासनाचे अधिकारी उपस्थित होते. व राजकीय कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *