fbpx
Home > आरोग्यविषयक > पालघरमध्ये ८१७ रुग्ण देखरेखीखाली

पालघरमध्ये ८१७ रुग्ण देखरेखीखाली

जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्णमध्ये वाढ झाली असून जिल्ह्यात १३ बाधित रुग्ण असनु पैकी २ जण दोन दिवसांपूर्वी मृत पावले आहेत, परदेशातून आलेले प्रवाशी व अन्य ,१ हजार ०५ नागरिकाची छाननी करण्यात आली असून ८१७ जण देखरेखीखाली ठेवण्यात आले असून पालघरातील त्या पॉझिटिव्ह महिलेला ठाणे सिव्हील हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले आहे.

पालघर ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टर, नर्स, कर्मचारी यांचे व पॉझिटिव्ह आलेल्या मात्र मृत रुग्णामुळे ३० जणांचे नमुने तपासणीसाठी पाठविले आहेत त्यांचा अद्याप अहवाल प्राप्त झालेला नाही.

करोनाची रुग्णाच्या जवळपास राहिलेल्या १२० जणांना वेगळं विलगीकरणं करण्यात आले आहे, तर १४ दिवसाचा कालावधी ४२२ जणांनी पूर्णं केल आहे, प्रकृती सुधारत असलेले २७ जण असून थुंकीचे १८८ जणांचे नमुने पाठविण्यात आले आहेत, आत्तापर्यंत ९५ जणांचे अहवालात निगेटिव्ह आले आहेत, तर ११ पॉझिटिव्ह व २ मृत्यू झाले आहेत, दरम्यान १८८ जणांच्या नमुन्याचा अहवाल येणे अजून बाकी आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *