fbpx
Home > तंत्रज्ञान > पालघरमधील तरुणांसाठी मोफत मोबाईल रिपेअरिंग प्रशिक्षणाची सुवर्णसंधी!!!

पालघरमधील तरुणांसाठी मोफत मोबाईल रिपेअरिंग प्रशिक्षणाची सुवर्णसंधी!!!

जिल्ह्यातील तरुणांना स्वयंरोजगार देऊन स्वतःच्या पायावर उभे करण्याच्या उद्देशाने सेवा सहयोग फाऊंडेशन संचलित बोईसर येथील स्वामी विवेकानंद सेवा केंद्र येथे दिनांक २० जानेवारी २०२० पासून मोफत मोबाईल रिपेअरिंग प्रशिक्षणाची सुरुवात करण्यात येथ आहे.

तीन आठवडे चालणाऱ्या या प्रशिक्षणात मोबाईल कंपोनंट्स, मोबाईल हार्डवेअर, मोबाईल सॉफ्टवेअर, कंपोनंट सोल्डरिंग इत्यादी विषयात प्रशिक्षण देण्यात येईल. त्याचबरोबर प्रशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना बाजार भेट सुद्धा घडवून आणण्यात येणार आहे.

१८ वर्षांवरील तरुण आणि तरुणी या प्रशिक्षणासाठी पात्र असून हे प्रशिक्षण पूर्णपणे मोफत आहे. मात्र प्रशिक्षण घेण्यासाठी २०० रुपये अनामत रक्कम घेतली जाईल जी प्रशिक्षण पूर्ण केल्यावर परत करण्यात येईल. या प्रशिक्षणासाठी जागा मर्यादित असल्याने इच्छूकांनी त्वरित संपर्क करावा.

प्रशिक्षण स्थळ : स्वामी विवेकानंद सेवा केंद्र, विलास फार्म, लोखंडीपाडा, बोईसर (पूर्व), ४०१५०१.

प्रशिक्षण कालावधी : २० जानेवारी ते १० फेब्रुवारी २०२०, दररोज ५ तास

अधिक माहितीसाठी संपर्क साधावा : भाविका म्हात्रे – ७७९८१५१९८१, अक्षय वणे – ९९८७६५१२९४

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *