fbpx
Home > अपघात > बोरहट्टी गावातील ‘त्या’ कुटुंबाचे स्थानिक आमदार व समाजसेवकांनी केले सांत्वन…

बोरहट्टी गावातील ‘त्या’ कुटुंबाचे स्थानिक आमदार व समाजसेवकांनी केले सांत्वन…

जव्हार तालुक्यातील बोरहट्टी गावात घराच्या कामासाठी माती खोदताना मातीची धडी अंगावर कोसळून मनोज यशवंत जाधव (वय ३०) व मुक्ता सुदाम तराळ (वय १६) यांचा मातीखाली दबून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना शुक्रवार १० एप्रिल रोजी घडली होती. या अपघातात अजून दोन महिला गंभीर जखमी झाल्या व चार जणांना किरकोळ दुखापत झाली होती.

सदरच्या घटनेची माहिती मिळताच विक्रमगड विधानसभा मतदार संघाचे आमदार सुनिल भुसारा व जिल्हा परिषद सदस्य व जिजाऊ शैक्षणिक सामाजिक संस्था सदस्य हबीबभाई शेख यांनी तात्काळ या कुटुंबीयाची भेट घेऊन मृत व्यक्तींच्या कुटुंबीयांना जीवनावश्यक अन्नधान्य व आर्थिक मदत रोख रक्कम प्रत्येकी ५०००/ रू देण्यात आली तसेच शासन स्तरावरून मिळवून देण्याचे आश्वासन देण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *