fbpx
Home > अपघात > वाडामध्ये रबर कंपनीला भीषण आग, लाखो रुपयांचा माल जळून खाक

वाडामध्ये रबर कंपनीला भीषण आग, लाखो रुपयांचा माल जळून खाक

तालुक्यातील खुपरी ग्रामपंचायतीच्या हद्दीतील रबर तयार करणाऱ्या  ‘रबर क्लार्क’  या कंपनीला आज पहाटे तीनच्या सुमारास भीषण आग लागली. या आगीत कच्चा- पक्का माल, कंपनीतील इतर सामान व कंपनीची इमारत जळून खाक झाली. आगीची माहिती मिळताच अग्निशामक दलाच्या पालघर, भिवंडी, वसई, तारापूर गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या व त्यांनी आगीला नियंत्रणात आणले.

या आगीत कंपनीचे लाखो रुपयांचे नुकसान झाले असून आगीचे कारण अद्याप समजू शकलेले नाही परंतु शॉर्ट सर्किटमुळे आग लागली असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *