fbpx
Home > इतर घडामोडी > पालघरमध्ये गृहमंत्री अनिल देशमुख यांचा दौरा, पोलीस अधीक्षक गौरव सिंह सक्तीच्या रजेवर

पालघरमध्ये गृहमंत्री अनिल देशमुख यांचा दौरा, पोलीस अधीक्षक गौरव सिंह सक्तीच्या रजेवर

पालघर जिल्ह्यातील गडचिंचले येथे चोर समजून २ साधू आणि वाहनचालकाला दगडाने ठेचून निर्घृण हत्या करण्यात आली होती. या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला होता. या घटनेनंतर राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी यांनी काल घटनास्थळाला भेट दिली. यावेळी त्यांनी कासा पोलिस ठाणे आणि गडचिंचले येथील घटनास्थळी भेट दिली.

सकाळी ११ वाजल्याच्या सुमारास गावात पोहोचल्यानंतर त्यांनी सरपंच, काही ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थांशी चर्चा केली. त्यांच्यासोबत हत्याकांडाचे प्रत्यक्षदर्शी, जिल्हा परिषदेचे सभापती, विक्रमगड विधानसभेचे आमदार सुनील भुसारा, खासदार राजेंद्र गावित उपस्थित होते. दरम्यान गृहमंत्री मुंबईला परतताच हे हत्याकांड माणुसकीला काळीमा फासणारे असल्याचे सांगून याप्रकरणी दोषी म्हणून पालघरच्या पोलीस अधीक्षकांना सक्तीच्या रजेवर पाठवण्याचा निर्णय त्यांनी घेतला. त्याचसोबत पालघर जिल्ह्याचा कारभार जिल्ह्याचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक यांच्याकडे सोपवला असल्याचे त्यांनी जाहीर केले.

याप्रकरणी कासा पोलीस स्टेशनचे दोन अधिकारी व तीन कर्मचाऱ्यांना यापूर्वीच निलंबित करण्यात आले होते. जिल्ह्यातील ३५ कर्मचाऱ्यांना जिल्ह्यात इतरत्र बदली करण्यात आली होती. या हत्याकांड प्रकरणाची चौकशी गुन्हा अन्वेषण विभागाकडून करण्यात येत असून या चौकशीचा लवकरच अहवाल प्राप्त होईल, असे गृहमंत्र्यांनी पालघरमध्ये सांगितले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *