fbpx
Home > इतर घडामोडी > गडचिंचले तेथील प्रकरणी नागरिकांनी राज्य गुन्हे अन्वेषण विभागस माहिती दयावी – राज्य गुन्हे अन्वेषण

गडचिंचले तेथील प्रकरणी नागरिकांनी राज्य गुन्हे अन्वेषण विभागस माहिती दयावी – राज्य गुन्हे अन्वेषण

१६ एप्रिल रोजी पालघर मधील गडचिंचले येथे घडलेल्या दोन साधू व त्यांच्या चालकाच्या हत्येबाबत नागरिकांना काही माहिती असेल तर तात्काळ राज्य गुन्हे अन्वेषण विभाग यांना दयावी माहिती देणाऱ्या व्यक्तीबाबत गुप्तता पाळली जाईल, असे राज्य गुन्हे अन्वेषण विभागाने  प्रसिद्धी पत्रकाद्वारे सांगितले आहे.

१६ एप्रिल रोजी कासा पोलीस ठाणे अंतर्गत गडचिंचले या गावातील वन विभागाच्या चौकीजवळ रात्रीच्या वेळी जमावबंदीचा आदेश असतानादेखील बेकायदेशीर जमावाने एका इंको मोटार वाहनातून प्रवास करणाऱ्या दोन साधू व त्याच्या चालकाची दगड, काठया इत्यादी हत्यारांनी अत्यंत क्रूरपणे हत्या केली आहे. सदर गुन्हयाचा तपास राज्य गुन्हे अन्वेषण विभाग, कोकण भवन नवी मुंबई यांच्या मार्फत करण्यात येत. या तपासाला योग्य गती मिळावी यासाठी विभागातर्फे सर्व जनतेस जाहीर आवाहन करण्यात आले आहे त्याचप्रमाणे सदर गुन्हयाबाबत कोणाकडे काही महत्वाची माहिती असल्यास किंवा व्हिडीओ रेकॉर्डिंग, फोटोज अथवा गुन्हयातील सहभागी आरोपीबाबत काही माहिती असल्यास राज्य गुन्हे अन्वेषण विभाग कोकण भवन नवी मुंबई यांच्याशी तात्काळ संपर्क आवाहन केले आहे. अशी माहिती देणाऱ्या  व्यक्तीचे नाव किंवा माहिती गुप्त ठेवण्यात येणार आहे. संपर्कासाठी ईमेल आयडी : cidkon-mum@mahapolice.gov.in तसेच भ्रमणध्वनी : 09870437786 या माध्यमातून संपर्क साधता येईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *