fbpx
Home > इतर घडामोडी > धक्कादायक : पालघरमध्ये फेसबुकवरून घरपोच दारू विक्री

धक्कादायक : पालघरमध्ये फेसबुकवरून घरपोच दारू विक्री

देशामध्ये लोकडाऊन असताना जेथे जीवनावश्यक वस्तू मिळविण्यासाठी लोकांची धडपड चालू असताना पालघर मधील एका महाभागाने घरपोच दारू विकण्याची जाहिरातच फेसबुक अकाउंटद्वारे केली आहे.

https://www.facebook.com/Sahil-kumar-102021471501809/

साहिल कुमार असे या व्यक्तीचे नाव असून त्याने त्याने २८ एप्रिल २०२० रोजी ह्याच नावाने रात्री ११.२२ वाजता हे अकाउंट बनविले आहे आणि त्यामध्ये आपला संपर्क क्रमांक देऊन वैशाली वाईन्स नावाच्या दारूच्या दुकानाचा फोटो शेअर केला आहे. सोबत दारू आणि बिअरच्या बॉटल चा फोटोदेखील शेअर केला आहे. या जाहिरातीला बहुतेक लोकांनी कमेंट देखील केली आहे व त्यामध्ये  फेक असल्याचे बोलले जाते. परंतु या जाहिरातीला प्रचार फेसबुकद्वारे पैसे देऊन (Boost Post) करण्यात आला असल्याचे समजते. तसेच Truecaller वर हा नंबर सर्च केला असता पटेल नावाने सेव्ह करण्यात आला आहे. दरम्यान सदर बाब पालघर पोलिसांच्या फेसबुक आणि ट्विटरद्वारे निदर्शनास आणून देण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *