जितू घरत : पालघर जिल्ह्यातील गिर्यारोहक हर्षाली वर्तक येत्या ५ सप्टेंबरला जपान मधील फुजी शिखर सर करायला निघणार आहे. महापौर रुपेश जाधव, उपमहापौर प्रकाश रॉड्रीग्ज यांनी या मोहीमेसाठी आज तीला फ्लॅग ऑफ केले.
महापौर रुपेश जाधव यांच्याकडून तिला वसई विरार शहर महानगरपालिकेचा झेंडा सुपूर्द करुन, तीच्या वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
जगात धोकादायक चढाई करण्यांत येणाऱ्या ७ शिखरांपैकी एक असलेल्या जपान माऊंट फुजी येथे जाणारी ती पालघर जिल्हा व महाराष्ट्रा राज्य, तसेच संपूर्ण भारतातून ८ गिर्यारोहकांमध्ये ती एकमेव महिला गिर्यारोहक आहे.