fbpx
Home > खेल > बक्षिसांसाठी गोविंदा वळतोय ठाण्याकडे

बक्षिसांसाठी गोविंदा वळतोय ठाण्याकडे

दहीहंडी समन्वय समिती गेले दोन ते तीन महिने सातत्याने आयोजक आणि गोविंदा मंडळांना सुरक्षित दहीहंडीचे आवाहन करत आहे. परिणामी यंदा विमाकवच मिळालेल्या मंडळांची संख्या गेल्या वर्षापेक्षा अडीच पटीहून अधिक वाढली आहे. यंदा अनेक पथकांनी उत्साहाने सराव केला असला तरी दहीहंडीचे आयोजक मात्र कमी झाले आहेत. प्रतिष्ठेची समजली जाणारी जांबोरी मैदानातील ‘संकल्प’ यांची दहीहंडी यंदा नाही आहे.

उच्च न्यायालयाच्या सुरक्षेच्या निर्देशांच्या पालनावरून अडचणीत येऊ नये म्हणून अनेक मोठ्या आयोजकांनी दहीहंडी आयोजन न करण्याचा निर्णय घेतला आहे. त्या तुलनेत ठाण्यामध्ये २१ लाखांच्या दोन दहीहंड्या आहेत. मुलुंडमध्येही रिपब्लिकन पार्टीतर्फे २१ लाखांची दहीहंडीचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामुळे दादर पश्चिमेला स्टेशन परिसरात रंगणाऱ्या दहीहंडीला सलामी देऊन गोविंदा पथके ठाण्याच्या दिशेने रवाना होण्याच्या मार्गावर आहेत.

मुंबईमध्ये लहान, मध्यम आणि मोठ्या अशा जवळपास हजारभर हंड्या असतील. त्यामध्येही पुढील वर्षी निवडणुकांमध्ये ज्यांना उतरायचे आहे असे संधिसाधू चेहरे दहीहंडी आयोजनामध्ये पुढाकार घेताना दिसत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *