fbpx
Home > इतर घडामोडी > वर्तक महाविद्यालयाचा वार्षिक क्रीडादिन संपन्न

वर्तक महाविद्यालयाचा वार्षिक क्रीडादिन संपन्न


आगाशी-विरार अर्नाळा शिक्षण संस्था संचालित विरार पूर्व येथील पद्मश्री भाऊसाहेब वर्तक महाविद्यालय व एन. जी. वर्तक महाविद्यालयाचा वार्षिक क्रीडादिन मोठ्या उत्साहात नुकताच संपन्न झाला. या कार्यक्रमासाठी आंतरराष्ट्रीय बॉक्सर खेळाडू विक्रमसिंग अनंतसिंग पडवळ व आंतरराष्ट्रीय धावपटू पिंकी सिंग प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

या निमित्ताने विद्यार्थ्यांसाठी विविध खेळांचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या सुरुवातीला मंचावर संस्थेचे विश्वस्त सदस्य अनंत नाईक महाविद्यालयाच्या प्राचार्या सारिका रावत, तारामाई वर्तक सीबीएसई प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका रंजना कोळवणकर, एन. जी. वर्तक इंग्रजी माध्यम शाळेच्या माध्यमिक विभागाच्या पर्यवेक्षिका संगीता डिसिल्वा यांसह इतर मान्यवर उपस्थित होते. यावेळी मान्यवरांनी आपल्या भाषणातून विद्यार्थ्यांना एक क्रीडा संदेश दिला.

त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते रस्सीखेच या खेळाचे उद्घाटन झाले. तसेच कार्यक्रमात विद्यार्थ्यांची परेड झाली. तर दुसरीकडे विविध मैदानी खेळ विद्यार्थ्यांसाठी आयोजित केले होते. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते क्रीडा पारितोषिक वितरण सोहळा याप्रसंगी पार पडला. मैदानी खेळाला विद्यार्थ्यांची उपस्थिती पाहून विद्यार्थ्यांचे कौतुक मान्यवरांनी यावेळी केले. तसेच मैदानी खेळ वेळोवेळी महाविद्यालयाने आयोजित करून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव द्यावा, असे आवाहनदेखील केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कनिष्ठ महाविद्यालयाचे शिक्षक शेखर पाटील व शिक्षिका उलरिका रॉड्रिग्ज यांनी केले. या क्रीडादिनासाठी महाविद्यालयाच्या सर्व शिक्षकांनी विद्यार्थ्यांनी शिक्षकेतर कर्मचारी व सहकारी कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *