fbpx
Home > आरोग्यविषयक > विरार पूर्व येथील निरामय हॉस्पिटलतर्फे रविवारी मेडिकल कॅम्पचे आयोजन

विरार पूर्व येथील निरामय हॉस्पिटलतर्फे रविवारी मेडिकल कॅम्पचे आयोजन

विरार पूर्व येथे नव्याने सुरू झालेल्या निरामय हॉस्पिटलमध्ये विभागातील गरजू लोकांसाठी रविवार ६ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ ते सायंकाळी ५ या वेळेत मेडिकल कॅम्पचे आयोजन करण्यात आले आहे.

या कॅम्पमध्ये सर्वसाधारण आजार, हाडाचे आजार, प्रसूतीरोग व बालरोग यावर विनामूल्य मार्गदर्शन करण्यात येईल तसेच सर्वसाधारण आजार, ब्लडप्रेशर आणि नेबुलीझर वर विनामूल्य उपचार करण्यात येईल. त्याचबरोबर रक्तातील साखरेचे प्रमाण अवघ्या २० रुपयांत तपासले जा जाणारा आहे. या कॅम्पच्या दरम्यान कोणत्याही प्रकारच्या शास्त्रक्रियेवर विशेष सूट देण्यात येईल व वरीष्ठ नागरिकांवर देखील विशेष सवलतीच्या दरात उपचार करण्यात येणार असल्याचे निरामय हॉस्पिटलचे डॉ. संजय विश्वकर्मा यांनी आमच्या प्रतिनिधीला सांगितले.

कधी : रविवार ६ ऑक्टोबर २०१९
वेळ : सकाळी ११ ते सायंकाळी ५
स्थळ : निरामय हॉस्पिटल, साई पॅराडाईज, साई प्लाझा समोर, गणपती मंदिर च्या बाजूला, नारंगी, विरार पूर्व
संपर्क : 8369345100

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *