fbpx
Home > खेल > विरारच्या सायली जाधवला तालुकास्तरीय कराटे स्पर्धेत मिळाले द्वितीय पारितोषिक

विरारच्या सायली जाधवला तालुकास्तरीय कराटे स्पर्धेत मिळाले द्वितीय पारितोषिक

यंगस्टार ट्रस्ट, विरार पुरस्कृत, वसई तालुका कला – क्रीडा विकास मंडळ आयोजित वसई तालुका कला – क्रीडा महोत्सव नुकतेच वसई येथे पार पडली.

यावेळी वसई तालुकामधील विविध क्रीडा प्रकारच्या स्पर्धा भरविण्यात आल्या. यामध्ये वैयक्तिक कराटे (कुमोते १६ वर्षांखालील मुली) या क्रीडा स्पर्धेत विरार पूर्व येथील पाच पायरी भागात राहणारी आणि आशा गुरव संचालित जपान कराटे असोसिएशन ऑफ इंडिया या कराटे क्लासची विद्यार्थिनी सायली जाधव हिला द्वितीय पारितोषिक मिळाले. तिच्या या यशाबद्दल विभागातून कौतुक करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *