fbpx
Home > विरार > विरार पूर्व येथील अष्टविनायक सोसायटीच्या मुलांनी साजरा केला मातृदिन

विरार पूर्व येथील अष्टविनायक सोसायटीच्या मुलांनी साजरा केला मातृदिन

आज १० मे… जागतिक मातृदिन… ज्या महान व्यक्तीने आपल्याला जन्म दिला तिच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करणारा दिवस. आपल्या जन्मदात्री आई ह्या शब्दालाही विशेष महत्त्व आहे.

आजच्या धावपळीच्या जगामध्ये आई-वडिलांविषयी असणारी आस्था आणि आपुलकी जेथे कमी होत असताना दिसते तेथे विरार पूर्व साईनाथ नगर येथील अष्टविनायक सोसायटीमधील काही मुलांनी आपल्या आईबद्दल असणारे प्रेम व्यक्त करत स्वतःच्या इच्छाशक्तीप्रमाणे कागदाचा वेगवेगळ्या पद्धतीने वापर करत आणि त्यावर अतिशय रेखीव नक्षीकाम करून सुबक शुभेच्छा पत्र तयार केली व आपल्या जन्मदात्रीबाबत कृतज्ञता व्यक्त केली.

सोसायटीमधील प्रांजळ कुळये, सायली मेस्त्री, दर्शन काप, गौरी टेमकर, क्षितिज मोहिते, नमित काप, मैत्रेय चव्हाण, मंजिरी राऊत ह्या हुरहुन्नरी मुलांनी आईच्या प्रती हा आदर्श निर्माण केला आणि त्यांना प्रोत्साहन दिले प्रमोद डावरुंग आणि त्यांची पत्नी पायल डावरुंग या दाम्पत्याने.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *