fbpx
Home > इतर घडामोडी > लॉकडाऊन दरम्यान एकट्या राहणाऱ्या मृत व्यक्तीचे विरार पोलिसांनी केले अंत्यसंस्कार

लॉकडाऊन दरम्यान एकट्या राहणाऱ्या मृत व्यक्तीचे विरार पोलिसांनी केले अंत्यसंस्कार

आपल्या कुटुंबापासून दूर राहणाऱ्या एका ४२ वर्षीय व्यक्तीचे शहरात सध्या सुरू असलेल्या लॉकडाऊन मृत्यू झाला. कुटुंबातील अन्य सदस्य जवळ राहत नसल्याने स्थानिक पोलिसांनीच त्यांच्यावर हिंदू पद्धतीने अंत्यसंस्कार केले. त्यामुळे पोलिसांचा मानवी चेहरा पुन्हा एकदा समोर आला आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, विरार पूर्व फुलपाडा येथे राहणारे अयोध्या प्रसाद खरे (वय ४२) यांनी सोमवारी रात्री जेवण केल्यावर झोपी गेले. परंतु रोजच्या प्रमाणे ते सकाळी उठले नाही म्हणून शेजाऱ्यांनी दरवाजा ठोठावला परंतु आतमधून कोणताही प्रतिसाद आला नाही म्हणून याबाबत विरार पोलिसांना कळविण्यात आले. घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांच्या पथकाने घराचा दरवाजा तोडला असता अयोध्या प्रसाद खरे यांचे पार्थिव जमिनीवर पडले होते.

डॉक्टरच्या म्हणण्यानुसार, खरे यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. दरम्यान विरार पोलीस ठाण्याचे हेड कॉन्स्टेबल सुभाष शिंदे यांनी शिंदे यांच्या कुटुंबियांच्या विनंतीवरून हिंदू पद्धतीने अंत्यसंस्कार केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *